रत्नागिरी : जिल्ह्यात 700 शिक्षकांची मानधन तत्वावर नेमणूक

banner 468x60

आंतरजिल्हा बदलीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली. काही शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता रत्नागिरी जिल्हा परिषदेने मानधनावर तात्पुरत्या शिक्षकांची भरती करण्याचे निश्चित केले. जिल्ह्यातील 700 रिक्त पदांवर मानधन तत्वावर 700 शिक्षक भरण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील 725 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाल्यामुळे जिल्ह्यात 1752 शिक्षकांची पदे रिक्त झाली. शिक्षक नसल्यामुळे जिल्ह्यातील 161 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या.

रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने 9 हजार रुपये मानधनावर 700 शिक्षकांची तात्पुरती नेमणूक केली आहे.

त्यामुळे मंडणगड तालुक्यात 39, दापोली तालुक्यात 70. खेड तालुक्यात 67, गुहागर तालुक्यात 116, चिपळूण तालुक्यात 57, संगमेश्वर तालुक्यात 93 रत्नागिरी तालुक्यात 71, लांजा तालुक्यात 57 आणि राजापूर तालुक्यात 107 शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *