रत्नागिरी : घरात घुसून मुलीचे अपहरण, सुफियान शेखचा धक्कादायक प्रकार

banner 468x60

रत्नागिरी : घरात घुसून मुलीचे अपहरण, सुफियान शेखचा धक्कादायक प्रकार

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे घराचा लाकडी दरवाजा तोडून घरात घुसून फिर्यादीच्या बहिणीचे अपहरण
केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

ही घटना बुधवार, ३१ मे रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमाराला घडली आहे.

याबाबत रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुफियान सलीम शेख (२४, रा. भाट्ये – मुरकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी दुपारी सुफियानने फिर्यादी यांच्या घराचा
दरवाजा ताेडून जबरदस्तीने घरात प्रवेश केला.

यावेळी घरात फिर्यादी यांची आजी हाेती. घरातील लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने सुफियान याने घराचा लाकडी दरवाजा तोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


त्यानंतर फिर्यादी यांच्या आजी समोरच फिर्यादीच्या बहिणीचे जबरदस्तीने अपहरण करून घेऊन गेला.

याप्रकरणी १ जून रोजी फिर्याद दाखल करण्यात आली असून, शहर पोलिसांनी सुफियान विरोधात भारतीय दंड विधान कलम ३६५,४४७,४४८,४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *