मंडणगड : 19 गावांना दरडीचा धोका

banner 468x60

पावसाळ्यातील आपत्तींचे निवारण करण्याकरिता विविध पातळ्यांवर नियोजन करून महसूल प्रशासनास यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

मंडणगड तालुक्यातील १९ गावांना दरड कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचा शक्यता असल्याने धोकादायक गावांतील नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालिन परिस्थितीत धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर कऱण्यात येते.

त्यासाठी गावांमध्ये कम्युनिकशन ग्रुप तयार करण्यात आला आहे. यात मंडल अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच, उपसरपंच यांच्यासह गावातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

ग्रुपमध्ये सातत्याने संपर्क व माहितीचे आदानप्रदान सुरू केले आहे. पावसाळ्यात तालुक्यातील प्रमुख मार्ग दरड कोसळून बंद झाल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम व महामार्ग प्राधिकरणास अर्लट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याकरिता त्या त्या भागात जेसीबी ट्रॅक्टर, मनुष्यबळ यांची उपलब्धता करण्यात आली याशिवाय दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या तालुक्याची सर्व ठिकाणी वाहनचालकांकरिता वाहने सुरक्षित चालवण्यासाठी सूचनाफलकही लावण्यात आले आहेत.

तहसील कार्यालयात आपत्कालिन कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून, संकटकाळात तालुकावासीयांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी यासाठी ८००७२२५२३६ हा क्रमांक २४ तास उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आपत्तीशी संबंधित सर्व प्रशासकीय खात्यांना आपत्तीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *