दाभोळ बोरी बंदर रस्त्यात पडलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरून गेले आहेत. या मार्गावरून वाहने नेताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करत आपल्या ताब्यातील वाहने न्यावी लागत आहेत.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
दापोली तालुक्यातील सर्वात मोठया लोकवस्तीचे गाव असलेल्या दाभोळ गावातील बोरी बंदर नावाचा रस्ता नव्याने तयार करण्यात आला होता.
सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसाच्या सरीने रस्त्यातील खड्डयांमध्ये पाणी साचले आहे.
रस्त्यातील खड्डे हे गढूळ पाण्याने पुरते भरून गेल्याने या मार्गावरून वाहन चालकाना आपल्या ताब्यातील वाहने ही खड्डे चुकवत घेऊन जावी लागत आहेत.
तर पादचाऱ्यांनाही खड्डयात साचलेल्या गढूळ पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. पहिल्याच पावसात या रस्त्यातील वाहतूक ही अडथळ्याची ठरली अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग या रस्त्यातील खड्डे बुजवून हा मार्ग वाहतूक योग्य करणार का? अशा प्रकारचा येथे सवाल उपस्थित होत असून रहदारीची वर्दळ असणारा हा मार्ग पुढे उसगाव, नवसे, भाटी, ओणनवसे, गुढघे, उंबरघर या गावांकडे जाणारा असल्याने महत्त्वाचा मानला जातो.
याचा विचार करून रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरण्याची वाट न पाहता जिल्हा परिशदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दाभोळ या महत्वाच्या गावातील प्रमुख बाजारपेठेतून जाणाऱ्या दाभोळ बोरी बंदर या रस्त्यातील खड्डे त्वरित बुजवून रस्ता वाहतुकयोग्य करावा अशाप्रकारची मागणी दाभोळ गावातून होत आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*