दापोली तालुक्यामधील जालगाव बाजारपेठेत राहणाऱ्या अजिंक्य तलाठी या 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री 8.40 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य हा गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घरातील पहिल्या मजल्यावरील रूममध्ये गेला. रात्री उशिरापर्यंत तो खाली न आल्यामुळे पाहणी केली असता रूममधील सिलिंग फॅनला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत आढळून आला. याची खबर पोलीस स्थानकात देण्यात आली. आत्महत्येमागील नक्की कारण अद्याप समजू शकलेले नाही. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र नलावडे करीत आहेत
दापोली : 30 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Read Also
Recommendation for You
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे….
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे….
दापोली- पंचायत समिती दापोली अंतर्गत दापोली शिक्षण प्रभागस्तरीय वार्षिक हिवाळी क्रीडास्पर्धा नुकत्याच दापोली तालुक्यातील ताडील…
दापोली तालुक्यातील मुरुड येथे कराड येथून पर्यटनासाठी आलेल्या शशिकांत नारायण कांबळे (शनिवार पेठ, पाटण कॉलनी)…