दापोली : पर्यटनासाठी आलेल्या सातजणांचा मुरूड येथील रिसॉर्टमध्ये धुडगूस

banner 468x60

पुण्यातून पर्यटनासाठी आलेल्या सातजणांनी मुरूड (ता. दापाेली) येथील रिसाॅर्टमध्ये धुडगूस घातल्याचा प्रकार १० जूनला सायंकाळी ५:५० वाजता घडला.


🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

पर्यटकांनी रिसाॅर्टमधील केअर टेकर आणि कर्मचाऱ्यांना दमदाटीही केली. या प्रकरणी दापाेली पाेलिसांनी सातजणांवर बेकायदा जमाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विक्रम इम्यान्यल अनोलिक , विशाल शशिकांत पडळ, माधव मनाेहर निलेवाड, कृष्णा मच्छिंद्रनाथ यडांयत, गिरीष माेहन चव्हाण, नितीन केदारी आणि मिखाईल गायकवाड (सर्व रा. पुणे) अशी सातजणांची नावे आहेत.

हे सातजण १० जूनला सायंकाळी दापाेली तालुक्यातील मुरूड येथील सिल्वर सेंट ब्रीज रिसाॅर्ट येथे दाेन चारचाकी गाड्या घेऊन आले हाेते. सातजणांनी रिसाॅर्टमध्ये येऊन केअर टेकर व कामगारांना दमदाटी करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तसेच रिसाॅर्टमधील कर्मचारी विश्रांती घेत असलेल्या खाेलीत हे सर्वजण जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी खाेलीचा ताबा घेऊन खाेलीतील सामान अस्ताव्यस्त करून नुकसान केले.

यातील विक्रम अनाेलिक याने आपण वकील असल्याचे सांगून केअर टेकर व कामगारांच्या खाेलीचा ताबा घेतला. त्यानंतर दाेघांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रिसाॅर्टच्या केअर टेकरने दापाेली पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *