दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक येथे सुरू झाला आहे. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.
एकेकाळी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या पुढाकाराने दापोली नगरपंचायतीत स्थापन झालेल्या सत्तेला मंत्री कदम यांनी हादरा दिला आहे. ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी (ता. ४) पत्र दिले आहे.
जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्यानंतर तातडीने बैठक लावली जाईल. ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन १४ जणांचा एकत्र गट स्थापन केला आणि त्यांनी चार दिवसांपूलों शिंद शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या युवा नगरसेविका शिवानी खानविलका यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आहे.
मात्र, यामध्ये भोरे यांचा समावेश नव्हता. मोरे यांच्यावर विश्वास ठराव संमत झाल्यास शिंद शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग व शिवानी खानविलकर यांची नावे असतील असा अंदाज आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते व नगरसेवक विलास शिगवण हे उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते अनिल परब यांच्या पुढाकाराने तीन वर्षांपूर्वी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी नगरपंचायतीवर ठाकरे गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. सत्ता स्थापन केल्यापासून ठाकरे गटाच्या ममता मोरे नगराध्यक्षपदी आणि खालिद रखांगे उपनगराध्यक्षपदी पदावर आहेत.
यातील ठाकरे गटाचे असलेले उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोरे यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यावर आता उपनगराध्यक्षपदही बदलले जाणार आहे.
ममता मोरे, नगराध्यक्षा, दापोली – शिवसेनेची नगराध्यक्षा म्हणून कार्यभार पाहात आले आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहिले. मोरे कुटुंबीय सुरुवातीपासूनच शिवसैनिक आहेत. आता जे राजकारण सुरू आहे, ते कल्पनेपलीकडील आहे. माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचे प्रसारमाध्यमांकडून समजते. वरिष्ठांशी चर्चा करून यापुढील निर्णय घेऊ.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*