दापोली : ज्ञानदीप विद्यामंदिर वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविदयालयाचा निकाल 100 टक्के

banner 468x60

‘‘ज्ञानदीप’’ दापोली संचालित संतोषभाईमेहता वाणिज्य व विज्ञान क. महाविदयालयाचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून कु. टेटवलकर आसिया अबुबकर (91%) प्रथम क्रमांक, कु. मरवा सरफराज रखांगे (90.17%) द्वितीय क्रमांक, कु. मारिया रफिक चिपळूणकर (88.67%) व कु.अफिफा अलीखान परभुलकर (88.67%) तृतीय क्रमांक विदयालयात पटकावले आहेत. या परीक्षेत 27 विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी 27 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 15 विदयार्थीविशेष प्राविण्यासह व 07 विदयार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण , द्वितीय श्रेणीत 05 विदयार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. प्रशालेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा सरोज मेहता, उपाध्यक्षा शांता सहस्त्रबुद्धे, चिटणीस सुजय मेहता, सहचिटणीस विश्वास कदम, खजिनदार हसमुख जैन, संस्था पदाधिकारी विनय महाडिक, विजय पवार, सुहासिनी कोपरकर, गोपीनाथ महाडीक, शुभांगी गांधी, अशोक सावंत, रविंद्र कालेकर, गोविंद पवार, सुयोग मेहता, संकेत मेहता मुख्याध्यापक मधुकर मोरे, विभाग प्रमुख मुस्तकिम रखांगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *