चिपळूण : कुंभार्ली घाटात गाय आडवी आली, कार दरीत कोसळली

banner 468x60

चिपळूण – कऱ्हाड मार्गावरील कुंभार्ली घाटात रस्त्यावर दाट धुक्या अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने कार दरीत कोसळून अपघात झाला.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

कार रस्त्याच्या एका बाजूला दरीत कोसळून झालेल्या या अपघातात शिराळा (ता. सांगली) येथील वृद्धाचा मृत्यू झाला. काल, मंगळवारी (दि.१२) हा अपघात झाला.

कार चालक बाबासाहेब बाळू सुवासे (रा. सध्या दापोली, मूळ कोल्हापूर) हे दापोली येथे समाजकल्याणच्या वसतीगृहात अधीक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी ते आपल्या कारने एकटेच गावी कोल्हापूरकडे निघाले होते.

बहादूरशेख -चिपळूण येथे आले असता त्यांना काही प्रवाशांनी हात दाखविला असता त्यांनी गाडी उभी केली. यावेळी तिघा प्रवाशांनी त्यांना आम्हाला इस्लामपूरला सोडा अशी विनंती केली. परंतु, आपण तिकडे जाणार नाही असे सुवासे यांनी सांगितले.

आपण आम्हाला हायवेला सोडा अशी गळ त्यांनी घातल्याने एक पतीपत्नी व वृद्ध सुरेश लक्ष्मण कांबळे (७०, रा. शिराळा, सांगली) यांना कारमध्ये घेतले. कार घाट चढत असताना अचानक एक गाय कारच्या समोर आल्याने चालक सुवासे यांनी कार उजव्या बाजूला घेतली असता कार उलटली.

या अपघातात वृद्ध सुरेश लक्ष्मण कांबळे यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे बालनबाल वाचले. अपघात झाल्यानंतर चालक सुवासे व पतीपत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सुरेश कांबळे यांना बाहेर काढत असताना ते प्रवासी पतीपत्नी तेथून निघून गेले. मात्र, त्यांचा मोबाइल कारमध्येच पडल्याचे समजते. अपघातात कारचे सुमारे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर चिपळूण पोलिस स्थानकात कार चालक बाबासाहेब सुवासे यांनी फिर्याद दिली. हा अपघात अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत झाल्याने तेथे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *