
एप्रिलच्या सुरूवातीला पाणी टंचाईची झळ तालुक्यातील 7 गावांना जाणवू लागली असून त्यांनी टँकरची मागणी केली आहे. यातील तीन गावांना ग्रामपंचायतीमार्फत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये 8 गावांमधील 8 वाड्यांना यावर्षी पाणी टंचाई जाणवेल, असे प्रशासनाने म्हटले आहे. यामध्ये आंबेरे खुर्द, झोंबडी, काताळे, धोपावे, पाचेरीसडा आणि गोळेवाडी या गावांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात आराखड्यामधील धोपावे गावाने टँकरची मागणी केली आहे. परंतु या आराखड्याबाहेरील 6 गावांमध्ये जानेवारीपासूनच टंचाई जाणवत आहे. यामुळे आराखड्यामधील गावे धरून यावर्षी टंचाईग्रस्त गावांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होणार आहे. तालुक्यातील वेलदूर व रानवी या दोन गावांत जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर ग्रामपंचायतींनीच ग्रामनिधीतून आपल्या गावातील वाड्यांना एक दिवस आड टँकरने पाणी पुरवठा केला. त्यानंतर अंजनवेल गावातील कातळवाडी व सुतारवाडीला टंचाई जाणवू लागली आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या 19 तारखेपासून आरजीपीपीएलने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे