गुहागर : विजयपूर महामार्गावर ट्रक-एसटी मध्ये भीषण अपघात, 23 जखमी

banner 468x60

गुहागर-विजयपूर महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडी येथे मंगळवारी भीषण अपघात झाला.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

कर्नाटक सीमेजवळ एका ट्रकने एसटी पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एसटी बसचा चक्काचूर झाला.

या दुर्घटनेत एक जण ठार झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. यातील १२ प्रवाशी गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातस्थळी तीव्र उतार असल्याने पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट मागून एसटी बसला जोरदार धडकला.

ही धडक एवढी जोरदार होती की बसच्या मागील भागाचा चुराडा झाला. यात बस मधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर २३ जण गंभीर जखमी झाले.

यातील १२ जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *