खेड : बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी

banner 468x60

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करत मृतदेह लपवणाऱ्या आरोपी तरुणाला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सूर्यकांत एकनाथ चव्हाण असे या आरोपीचे नाव असून, बुधवार दि. ३ रोजी न्यायाधिशांनी ही शिक्षा सुनावली आहे. खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी दि. १९ जुलै २०१८ रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली. खूप शोधाशोध केल्यानंतरही ती न सापडल्याने तिच्या वडिलांनी खेड पोलिस स्थानकात तक्रार दिली होती.

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दि. २० जुलै रोजी या अल्पवयीन मुलीचा केसांना बांधावयाचा पट्टा गावातील एका इसमाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसला. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांतने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली. खेड पोलिसांनी सूर्यकांतला अटक करून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६ (आय), ३६३, ३६४, २०१, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दखल केला.

या खटल्यात तब्बल २८ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, कर्मचारी सूरज माने, राम नागुलवार यांनी या प्रकरणी सहकार्य केले.

सरकारी वकील ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांतला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग १ डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी व आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *