कोकण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ; खासदार विनायक राऊत यांची डोकेदुखी वाढणार

banner 468x60

राज्यात भाजपला राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आणखी मजबूत होणार आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

खासदार विनायक राऊत यांना या घडामोडीचा सर्वाधिक फटका बसणार असून या मतदारसंघातून खासदार राऊत यांना हॅट्ट्रिक साधण्यासाठी परिश्रम करावे लागणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात आलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातही बसले आहेत.


खासदार विनायक राऊत यांची डोकेदुखी वाढणार आहे. विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून दोनवेळा निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला. २०१९ मध्येही त्यांनी दणदणीत विजयी मिळवला.
२०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू होती.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर खासदार राऊत यांचा विजय सहज मानला जात होता.


कोकणातून पूर्वी सुरेश प्रभू आणि अनंत गीते सलग निवडून आले होते. त्यांच्यानंतर खासदार राऊत यांच्या नावे हा विक्रम होणार होता; परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राऊत यांची डोकेदुखी वाढली होती.


फुटलेल्या शिवसेनेतून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल; मात्र खासदार विनायक राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार होते.


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप आणि फुटलेल्या शिवसेनेची मते एकत्र होणार आहेत. काँग्रेस, राष्टवादी, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मते एकत्र होणार होती. या मतदार संघातील सहापैकी वैभव नाईक, राजन साळवी हे दोन आमदार ठाकरे गटाचे आहेत.


नितेश राणे भाजप आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम असे प्रत्येकी एक आमदार आणि फुटलेल्या शिवसेनेचे दीपक केसरकर, उदय सामंत असे दोन आमदार आहेत. ठाकरे गटापेक्षा भाजप एक पाऊल पुढे वाटत असताना चिपळूणची राष्ट्रवादी खासदार राऊत यांच्याबरोबर राहिली असती तर त्यांना मोठा आधार मिळाला असता;


परंतू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *