कोकणात जाताय पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

banner 468x60

जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाला सुरवात झाली आहे. अनेक पर्यटकांना (Tourists) धबधबे, समुद्र, धरण, नदी आदी ठिकाणी पोहण्याचा मोह होतो. जिल्ह्यामधील अनेक धबधब्यांमध्ये छोटे-मोठे दगड वाहून येतात.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

धबधब्यांचा प्रवाह जास्त आहे. धबधब्यात (Waterfalls) उतरणारे लोक वाहून जाणे अथवा गंभीर जखमी होण्याची भिती आहे, अशा ठिकाणांना भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी. कोणत्याही ठिकाणी नियम व शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा लाभला आहे. त्या ठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, अनेक धबधबे, पाण्याचे डोह, घाट व घाटांमध्ये असणारे अनेक सनसेट पॉईंट्सवर भेट देण्यासाठी पर्यटक व नागरिक येत आहेत. जिल्ह्यामध्ये पावसाचे व वादळवाऱ्याचे प्रमाण अधिक आहे.

परिणामी, घाटामधील धुक्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याची दिसून येत आहे. काही दरडप्रवण क्षेत्रांमध्ये दरड कोसळण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे. परिणामी, वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

घाटांमधून प्रवास करणाऱ्या अथवा निसर्गप्रेमी लोकांनी घाटमाथ्यावर, अवजड वळणावर, सनसेट पॉईंट्सवर आपली वाहने उभी करून सेल्फी काढण्यासाठी थांबू नये. धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आपल्या वाहनाच्या फॉगलॅम्पचा व परावर्तकांचा योग्य वापर करावा.

अतिवृष्टीमुळे घाटामधील असणारी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा झाडांखाली आपली वाहने उभी करून ठेवणेदेखील टाळावे. अतिवृष्टीमुळे समुद्रामध्ये, धरण, पाणलोट क्षेत्र, नदी व नाल्यांमध्ये (पऱ्यांमध्ये) पोहण्याचा व तेथे भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *